उल्हासनगर : एका कोपऱ्यात उभा असलेल्या रिक्षात बसलेल्या तरुण अणि तरुणीला पोलिसांनी लाथा बुक्क्यानी मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याने या मुलीला चक्क अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली आहे. हा सर्व प्रकार एका मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे पोलिसांची दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पोलिसांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरमधील प्रभातनगर परिसरात गार्डन शेजारी उभ्या असलेल्या एका रिक्षात एक मुलगा मुलगी बसले होते. याठिकाणी हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह पोहचले. त्यांनी या दोघांना जाब विचारात थेट त्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीस अधिकारी वाघमारे इथेच थांबले नाही, तर त्यांनी चक्क मुलीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पोलिस – ती मुल घटनास्थळावरील आॅटो रिक्षात ₩अश्लील चाळे करत होते. अशी तक्रार गेली अनेक दिवस स्थानिक करत होते. त्याच रिक्षात बसून बीअर प्यायचे आणि गांजा देखील सापडलाय.व्हीडीओ पाहण्यासाठी लोगिन करा www.facebook.com/socialmedianews.org.in
Posted by Social Media News on Sunday, 27 December 2015
View article:
Maharashtra: Shocking video shows cops thrashing, abusing youth in Ulhasnagar